Video : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला
Share
मुंबई | प्रतिनिधी
दादर येथील शिवाजी पार्कवर झालेल्या शाही शपथविधी सोहळ्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात येऊन मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. आज सकाळी पदभार स्वीकारण्यापूर्वी उद्धव ठाकरे हुतात्मा स्मारक येथे गेले होते.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला
*महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला**Read More*👇https://www.deshdoot.com/udhav-thakare-taken-charge-of-as-chief-minister-of-maharashtra-breaking-news/
Posted by Deshdoot on Friday, 29 November 2019
आज उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार असल्यामुळे आज सकाळपासून याठिकाणी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते.
आज मुख्यमंत्र्यांच्या दालनात पहिलाच दिवस असल्यामुळे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा नावाची पाटी दालनाच्या बाहेर लावण्यात आली आहे. तसेच पतीभोवती फुलांची आरासदेखील लावत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी खास आकर्षक सजावट करवून घेतलेली दिसून आली.
याठिकाणी शिवसैनिकांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तर हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात टिपण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.