Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रVideo : महाराष्ट्रात किमान ३० एप्रिलपर्यंत राहणार लॉकडाऊन; रुग्णसंख्या शून्यावर आणावयाची आहे...

Video : महाराष्ट्रात किमान ३० एप्रिलपर्यंत राहणार लॉकडाऊन; रुग्णसंख्या शून्यावर आणावयाची आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात घोषित केलेले लॉकडाऊन येत्या १४ एप्रिल रोजी संपणार आहे. मात्र, राज्यातील परिस्थिती बघता अजून काही दिवस राज्यात लॉकडाऊन वाढविण्यात येणार आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

आज राज्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, अजून काही दिवस यावर काम केले जाणार आहे. कमीत कमीत ३० एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असेल. रुग्णसंख्या नियंत्रित झाल्यानंतर काही ठिकाणे शिथिल केली जातील. तर काही ठिकाणी प्रचंड कडक कारवाई करावी लागणार आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

* पंतप्रधानांसह आम्ही मास्क लावून होतो. ही हिम्मत फक्त या विषाणू मध्ये आहे.

* रुग्णच्या संख्येत वाढ झाली हे नक्की आहे.

* आपण संचार बंदी सुरू केली आणि नंतर लोकडाऊन

* जिथे पॉझिटिव्ह सवडले तिथे आपण सील केलं. तिथे जीवनावश्यक वस्तू पुरवथा आपण करतो

* जे रुग्ण सापडले त्यांच्या हिस्ट्री मधले लोकांना आपण जाऊन भेटतोय तपासणी करतोय.

* मुंबई तील रुग्णांमध्ये सौम्य, अति सौम्य असा प्रकार आहे. ज्यांना बरं वाटल त्याना आपण घरी सोडतोय

* 60 च्या जास्त वयाच्या लोकांना तसेच काही व्याधी असलेल्या लोकांना हा आजार होण्याची शक्यता जस्ट आहे.

* बाहेर पडू नका, जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांनी बाहेर पडताना मास्क लावा, घरच्यांची काळजी घेण्यासाठी आपण खब्रदरी घ्या।

* या काळात आपल्याला गाफील राहता येणार नाही.

* पाच आठवडे होतील आता पहिला रुग्ण सापडून. हा खूप स्लोव आहे पण मला मंद नको तर शून्य पाहिजे.

* साखळी तोडायची आहे आपल्याला आणि ती तोडली पाहिजे.

* लोकडाऊन कायम ठेवणार आहे असे मी मत मांडले. आपण या काळात कृषीविषयक कामे चालू आहेत.

* महाराष्ट्र धीरोदात्त आहे, शूर आहे. जेव्हा जेव्हा संकट येता तेव्हा तेव्हा महाराष्ट्र देशालाच नाही तर जगाला दिशा दाखवतो.

* आपण शिस्त जर व्यवस्थित पाळली आणि ही साखळी तोडली तर आपण लवकर बाहेर पडू.

* 14 नंतर काय करणार याच्या सूचना, विद्यापीठ शाळा उद्योगधंदे यावर काम सुरू आहे.

* एकूनच तुमचा मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सांगणं सर्तव्य म्हणहन मी आलो।

* माझ्या सरकार वर तुम्ही विश्वास दाखवला हे महत्वाचे.

* या काळात केंद्र राज्य एकमेकांसोबत आहोत.

* या कळत मला राजकारण नकोय.

* ही एकजूट कायम राहिली तर आपला देश जगातील महासत्ता बनेल.

* सगळे अडचणीत आहेत, सगळे बंधनात आहेत.

* वर्क फ्रॉम होम ज्यांना शक्य आहे त्यांनी करा.

* केवळ नाईलाजनाइ किमान 30 तारखेपर्यंत ( शिस्त ठेवली ) लोकडाऊन राहणार आहे.

* आताच हा प्रसार रोखावा लागणार आहे.

* अमेरिका देखील आपल्याकडे हात पसरते.

* आपणच सैनिक आहात.

* तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो.

* हरलेल्या मानसिकतेने आपण जिकणार नाही म्हणून आपण हे युद्ध जिंकणारच आहोत.

- Advertisment -

ताज्या बातम्या