उध्दव ठाकरे 25 जूनला पुणतांब्यात

0
पुणतांबा (वार्ताहर) – शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, ही रोखठोक भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आहे. शेतकरी संपादरम्यानही त्यांनी सर्वप्रथम पाठिंबा दिलेला होता. शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठीच श्री. ठाकरे रविवारी 25 जून रोजी दुपारी 3 वाजता पुणतांबा येथे येणार आहेत अशी माहिती खा. सदाशिव लोखंडे यांनी केले.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा नियोजित दौरा व पुणतांबा येथील शेतकरी मेळाव्याच्या नियोजनासाठी येथील ग्रामसचिवालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या शिवसेना पदाधिकारी व शेतकर्‍यांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते.
यावेळी सेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, माजी जिल्हाप्रमुख सुहास वहाडणे, डॉ. धनंजय धनवटे, धनंजय जाधव, नितीन औताडे, नाना बावके, कमलाकर कोते, किरण सुराळकर, रामदास गोल्हार, कैलास जाधव, बाळासाहेब चव्हाण, मच्छिंद्र धुमाळ, डॉ. महेश क्षीरसागर, विजयराव काळे, सचिन कोते, भास्कर मोटकर, अनिल बांगरे, सदा बहादुळे, प्रा. रमेश बोरनारे, आबा नळे, अनिल नळे, भास्कर नवले, बापासाहेब वाघ, महेश कुलकर्णी, प्रताप वहाडणे, गणेश बनकर, शंकर कुलकर्णी, संजय शिंदे, सर्जेराव जाधव, अमोल गायके, प्रमोद लभडे, एकनाथ गुलदगड, मुन्ना नवले, डॉ. दिलीप साळगट, अशोक थोरे आदींसह मोठ्या संख्येने अनेक मान्यवर शेतकरी उपस्थित होते.
खा. लोखंडे म्हणाले शिवसेना पक्षप्रमुखांनी सातत्याने शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर आवाज उठविला आहे. यावेळी त्यांनी निळवंडे प्रश्‍नांबाबत शेतकर्‍यांच्या बाजूने कशी भूमिका घेतली याची माहिती दिली. प्रास्ताविक अनिल नळे यांनी केले. यावेळी डॉ. धनंजय धनवटे, बाळासाहेब चव्हाण, सर्जेराव जाधव, आबा नळे, प्रा. रमेश बोरनारे, डॉ. महेश क्षीरसागर, डॉ. दिलीप साळगट, नाना बावके, सदा बहादुळे, मच्छिंद्र धुमाळ, प्रमोद लभडे, धनंजय जाधव,
मुंकुंद सिनगर यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे पुणतांब्यात येत असल्याबद्दल सुहास वहाडणे यांनी पुणतांबा हे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचा बहुमान असल्याचे स्पष्ट केले. रावसाहेब खेवरे यांनी आभार मानले. यावेळी श्री. ठाकरे यांच्या दौर्‍याबाबत व पुणतांबा येथील शेतकरी मेळाव्याबाबतच्या विविध बाबींवर चर्चा करून नियोजन करण्यात आले.

शेतकरी संपाची कल्पना पुढे आणणार्‍या पुणतांब्यातील शेतकर्‍यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी व शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे पुणतांबा येथे येत आहेत. शेतकर्‍यांचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी पक्षाचे प्रमुख पुणतांब्यात येणे ही अतिविशेष बाब आहे. त्यामुळे त्यांच्या दौर्‍याला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या दौर्‍याकडे लागले असून त्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी लाखोंच्या संख्येने शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही खा. लोखंडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*