Type to search

जळगाव फिचर्स मुख्य बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आज जिल्ह्यात

Share

जळगाव

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रमुख शरद पवार आज जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.जळगावातील जैन हिल्स येथे होणार्‍या आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्चतंत्र पुरस्कार वितरण समारोहात ते उपस्थित राहणार आहेत.

त्यासोबतच मुक्ताईनगर येथे होत असलेल्या शेतकरी मेळाव्यात ते उपस्थित राहतील. नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने मुख्यमंत्र्यांचा नंदुरबार दौरा रद्द करण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मुंबई येथील सांताक्रुझ विमातळ येथून विमानाने दुपारी 12.50 वाजता जळगाव येथे पोहचतील. तेथून मोटारीने ते दुपारी 1.10 मिनिटांनी पुरस्कार वितरण सोहळ्यास हजेरी लावतील. दुपारी 2.35 ते हेलिकॉप्टने मुक्ताईनगर येथील सभास्थळी पोहोचतील.

सायंकाळी 4 वाजता ते हेलिकॉप्टने जैन हिल्स येथील हेलिपॅडवर पोहचून 4.30 वाजता विशेष विमानाने मुंबईकडे रवाना होतील. त्यांच्यासमवेत राज्याचे कृषीमंत्री दादा भूसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित राहतील.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!