Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Share

मुंबई | प्रतिनधी 

नाणार रिफायनरी प्रकल्पा विरोधात आंदोलनामधील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी दिले आहेत. ते आज माध्यमांशी बोलत होते, यावेळी त्यांनी नाणार प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

कोकणात उभारण्यात येणाऱ्या नाणार तेल प्रकल्पाला भाजप वगळता सर्वच पक्षांनी विरोध केल्यामुळे बऱ्याच कालावधीसाठी हा विषय प्रचंड चर्चेत आला होता.

या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प उभारण्याचा चंग तत्कालीन सरकाने बांधला होता.

दुसरीकडे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने आणि भाजपच्या तिकिटावर राज्यसभेत गेलेल्या नारायण राणे यांनी प्रकल्पाला विरोध केल्याने सरकारची कोंडी झाली होती. तीव्र आंदोलन छेडल्यानंतर अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

राज्यात शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन केले. दरम्यान, मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाल्यानंतर त्यांनी आरे कॉलनीतील कार शेडला स्थगिती दिली. दुसरीकडे नाणार प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन छेडणाऱ्या आंदोलकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते, हे गुन्हे ठाकरे सरकारने तात्काळ मागे घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!