Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

Ayodhya Live updates: उद्धव ठाकरे राम जन्मभूमीवर दाखल

Share

अयोध्या: उद्धव ठाकरे सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राम जन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. शिवनेरी किल्ल्यावरील मातीचा कलश रामजन्मभूमीवर ठेऊन ते मंदिर निर्माणाचा संकल्प सोडणार आहेत. यावेळी संत-महंत, स्थानिक नेते अशा मोजक्याच मंडळींना रामजन्मभूमीवर प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती पहाऱ्यावरील पोलिसांकडून देण्यात आली.

राम मंदिर निर्माणाच्या मागणीसाठी आज अयोध्येत हिंदुत्ववादी संघटनांनी ठाण मांडले आहे. विश्व हिंदू परिषदेसह आरएसएसच्या इतर संलग्न संघटनांकडून येथे धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ही धर्मसभा असणार आहे. यामध्ये सुमारे ३ लाख रामभक्त सहभागी होतील असे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सहपरिवार अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. हजारो शिवसैनिकही येथे उपस्थित आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!