Type to search

6 वर्षांपासून काम नसलेला उदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट

मुख्य बातम्या हिट-चाट

6 वर्षांपासून काम नसलेला उदय चोप्रा डिप्रेशनमध्ये; ट्विटरवर लिहिली सुसाइड नोट

Share
मुंबई : ‘मोहब्बतें’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अभिनेता उदय चोप्रा अलीकडे त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आला. सहा वर्षांपूर्वी आलेल्या ‘धूम 3’मध्ये उदय अखेरचा दिसला होता. यानंतर कुठल्याही तो चित्रपटात दिसला नाही. दोन दिवसांपूर्वी उदयने एक ट्विट केले आणि बॉलिवूडमध्ये जणू ‘भूकंप’ आला. होय, या ट्विटमध्ये उदयने आत्महत्येचा विचार बोलून दाखवला.
‘मी माझे ट्विटर अकाऊंट काही तासांसाठी डि-अ‍ॅक्टिवेट केलेय. असे वाटले मी मरणार आहे. हे अभूतपूर्व होते. माझ्यामते, आत्महत्या एक चांगला पर्याय आहे. मी लवकरच हा पर्याय स्थायीरूपात स्वीकारू शकतो,’ असे त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले. ‘मी ठीक नाही, हे मी कबुल करतो. आत्तापर्यंत मी प्रयत्न करतोय पण अपयशी ठरतोय,’असेही त्याने म्हटले होते.
काही वेळेनंतर हे दोन्ही ट्वीट डिलीट करण्यात आली होती. मात्र तोवर या ट्वीटचे अनेक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याच्या या ट्वीटनंतर मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जातं की, उदय सध्या नैराश्यग्रस्त असल्याचे म्हटले.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!