Viral Video : पंतप्रधानांपासून तिरंग्यापर्यंत या चिमुकल्याची स्मरणशक्ती बघून सर्वच होतात अवाक्

0
आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, देशाचे राष्ट्रगीत, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय झाड, राष्ट्रीय प्राणी यांची प्राथमिक माहितीच नसते. पण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील हा चिमुकला वरील प्रश्न अगदी खेळत खेळत देतो.

या मुलाचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ बघितल्यानंतर तुमचीही बोलती बंद होईल. तो पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीपर्यंत, स्वातंत्र्य दिनापासून ते प्रजासत्ताकदिनापर्यंत सर्वच तारखांसह विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे अगदी काही सेकंदात देतो.

त्याचे हे ज्ञान बघून भले भले थक्क झाले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. व्हॉट्सअँप, फेसबुकच्या माध्यमातून हा व्हिडीओ इतरत्र पोस्ट केला जात असून स्मार्टफोनधारी सर्वच सध्या या व्हिडीओची चर्चा करतांना दिसून येतात.

या व्हिडीओतील चिमुकल्याचे वयवर्ष अवघे अडीच ते तीन वर्ष आहे. सर्वसामान्य कुटुंबातील हा चिमुकला असून त्याने त्याच्या हुशारीने सर्वांचीच मने जिंकली आहेत.

हा मुलगा एवढा हुशार कसा असू शकतो असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. हा व्हिडीओ नक्की बघा असे आवाहनदेखील सोशल मीडियात युजर्स करू लागले आहेत.

 

LEAVE A REPLY

*