Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

गॅलरीतून पडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू

Share

संगमनेर (प्रतिनिधी) – डोळ्यादेखत आपलं दोन वर्षाचं मुल गॅलरीतून पडताना पाहिलेल्या आईने त्याला वाचविण्यासाठी गॅलरीतून उडी मारली खरी..मात्र दुर्दैवं मुल वाचलं नाही. आई मात्र जखमी झाली. अंगाखांद्यावर खेळणारं मूल डोळ्यादेखत भुर्रकन उडून गेलं..नी आईने हंबरडा फोडला.या हृदयद्रावक घटनेनं संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी शिवारातील श्री गणेश कॉलनी नागरिकांची मनं पिळवटून गेली.

घुलेवाडी परिसरातील श्रीगणेश कॉलनीत कृष्णा आरोटे यांचे कुटुंब राहते. काल सायंकाळच्या 6.30 वाजता शिवम (वय 2 वर्ष) हा गॅलरीत खेळत होता. त्यावेळी आई सारीका देखील जवळच उभी होती. मात्र अचानक शिवम गॅलरीतून खाली पडला. हे पाहताच आईने देखील त्याला वाचविण्यासाठी उडी मारली. मात्र दुर्दैवाने शिवम निपचीत पडला होता. आईने हंबरडा फोडला. वडील धावत आले. त्याला उचलून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. अंगाखांद्यावर खेळणारं मुल असं डोळ्यादेखत निघून गेल्यानं आरोटे परिवार शोकसागरात बुडाला.

घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर शिवमचा मृतदेह आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यास दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 120/19 प्रमाणे नोंद केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पालवे करत आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!