नाशकात दोन महिलांचा विनयभंग; दोघे ताब्यात

0
नाशिक । शहरात विविध दोन घटनांमध्ये दोन महिलांचा विनयभंग केल्याच्या घटना सोमवारी (दि.12) घडल्या आहेत. या प्रकरणी पंचवटी व मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत गंगाघाटावरील चहाची टपरी चालविणारी महिला बोलत नसल्याच्या कारणावरून तिचा दोघांनी विनयभंग केल्याचा प्रकार घडला.

याप्रकरणी संशयित सागर दत्तू परदेशी (24), विक्की संतोष परदेशी (24, दोघे रा. निलगिरीबाग, औरंगाबादरोड, पंचवटी) यांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, गंगाघाटावरील मरिमाता मंदिराशेजारी पिडीत महिलेची चहाची टपरी आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्यासुमारास संशयित सागर परदेशी व विक्की परदेशी त्याठिकाणी आले आणि संशयित सागर याने सदर महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला.

यावेळी तीने प्रतिसाद न दिल्याने बोलत का नाहीस, असे विचारत संशयित सागर याने तिचा हात धरून अश्लिल चाळे केले. पिडीतेने आरडाओरडा केला असता, तिची आई मदतीला धावली तर, संशयित सागर याने पीडितेच्या आईलाही ढकलून देत शिवीगाळ केली.

याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयितांना रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांनी अटक केली आहे.

दुसरी घटना गडकरी चौकातील आदिवासी विकास भवन कार्यालयासमोर घडली. या घटनेत पीडित महिलेला फोनवरून संपर्क साधून तिच्याशी अश्लिल संवाद साधल्याने संशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आदिवासी विकास भवनसमोर सदरची महिला आली असता, संशयित सोमनाथ नाना गायकवाड याने सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास फोन करून त्यावरून अश्लिल संवाद साधून लज्जा उत्पन्न होईल असे शब्द वापरले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात संशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*