टी.व्ही. मालिका बघून मुलींनी स्वतःच रचला अपहरणाचा बनाव

0
नवीन नाशिक |  नवीन नाशकातील अपहरण झालेल्या दोघा मुलींनी अपहरणाचा बनाव केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.  आई मारेल या भीतीने हा केला बनाव केला तसेच टी व्ही सिरीयलमध्ये असे बघितले असल्याने  खोटे सांगितले असल्याचे या मुलींनी पोलिसांसमोर कथन केले आहे.  
या घटनेची माहिती अशी की, पाटीलनगर परिसरातून दोन मुलींचे अपहरण झाल्याची घटना सायंकाळी घडली असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
दोन्ही मुली एका घरात आढळून आल्या होत्या. दोन्ही मुली ८ ते ९ वर्षांच्या असून जुळ्या बहिणी आहेत. या मुलीना
शिवशक्ती नगर मधील सरस्वती चौकातील एका घरात डांबून ठेवल्याची वार्ता सगळीकडे पसरली. त्यानंतर घरातील रहिवाश्यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

दरम्यान, घराचा मालकाचा या प्रकरणाचा काहीही संबंध नसल्याचे परिसरातील  महिलांनी पुढे येत सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या मुलींची चौकशी केली. चौकशीअंती आई मारेल या धाकाने हा बनाव रचल्याचे या मुलींनी सांगितले.

LEAVE A REPLY

*