दोन वाहतुक पोलिसांना मारहाण; मोटारसायकलस्वरांची मुजोरी

0
नाशिक । शहर व परिसरात वाहतुक पोलीसंना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून शनिवारी (द़ि 14) दोन विविध घटनांमध्ये दोन वाहतुक पोलीसांना मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.

नशिक पुणे रोडवर सिग्नल तोडल्याने दुचाकी वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केल्याचा राग आल्याने तर शालिमार येथे दुसर्‍या घटनेत एकेरी मार्गावरून जात असल्याने थांबविल्याचा राग आलेल्या मुजोर दुचाकीस्वारांनी एका पोलीस कर्मचार्‍यास मारहाण तर दुसर्‍याच्या अंगावर दुचाकी घातल्ाून जखमी केल्याच्या घटना शनिवारी घडल्या.

भद्रकाली पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक यतिन पवार हे शनिवारी सायंकाळच्या सुमारास शालीमारच्या देवीमंदिराजवळ कर्तव्यावर होते़ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास यामाहा दुचाकीवरून (एमएच 15, एफजे 6425) आलेले संशयित नीलेश पाटील (31, श्रीकला अपार्टमेंट, एकता कॉलनी, इंदिरानगर) हे एकेरी मार्गावरून जात असल्याने पवार यांनी दुचाकी थांबविण्यास सांगितले़.

यावेळी पाटील यांनी आपली दुचाकी पवार यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याने दुचाकीचे पुढील चाक पायावरून गेले़ यामुळे पवार जखमी झाले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या घटनेत शहर वाहतूक शाखेच्या युनिट चारमधील पोलीस शिपाई नंदू गवळी हे दुपारी बारा वाजेच्या सुमारास फेम टॉकीज सिग्नलवर कर्तव्यावर होते़ यावेळी पुणे – नाशिक रोडने ड्रीम युगा दुचाकीवर (एमएच 15, ईसी 8665) आलेल्या संशयित विकास सुभाष हुळहुळे (30, रा़वडगाव पिंगळा, ता़सिन्नर, ज़िनाशिक) याने सिग्नल तोडला़ यामुळे पोलीस कर्मचारी गवळी यांनी सिग्नल तोडल्याबाबत तसेच वाहनांची कागदपत्रांची मागणी केली.

याचा राग आल्याने संशयित हुळहुळे व त्याच्या साथीदाराने शिवीगाळ करून गवळी यांना मारहाण करून जखमी केले़ या प्रकरणी गवळी यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

LEAVE A REPLY

*