Type to search

Breaking News

चोरीच्या दुचाकीसह दोघांना अटक 

Share
सिन्नर | वार्ताहर
शिर्डी महामार्गावर मंगळवारी (दि.13) मध्यरात्री भोकणी फाटा परिसरात संशयास्पद फिरणाऱ्या दोघांना चोरीच्या दुचाकीसह वावी पोलिसांच्या गस्ती पथकाने  ताब्यात घेतले. त्यांच्याकडून  मिळून आलेल्या दुचाकी संगमनेर येथून चोरीस गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मंगळवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, हवालदार योगेश शिंदे, विजय बेदडे हे शासकीय वाहनातून दरोडा गस्त घालत असताना भोकणी फाटा परिसरात भोकणी गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर ज्ञानेश्वर दत्तू माळी  (27) रा. चेंडूफळ, ता. वैजापुर  व मंगेश सदू सूर्वे (19) रा. गंगामाई घाट ता. संगमनेर हे दोघे दुचाकीस्वार संशयास्पदरित्या आढळून आले.
त्या दोघांना हटकले असता असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असणाऱ्या बजाज डिस्कव्हर क्र. एम.एच.17/ ए.बी.7884  व बजाज प्लॅटिना क्र. एम.एच. 15 / बी.व्ही.9470  या दोन्ही दुचाकी चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले.
संगमनेर येथून या दोन्ही दुचाकी लांबवण्यात आल्याची कबुली दोघांनी दिली. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली.
वावी व परिसरातील दुचाकी चोरीच्या काही घटनांमध्ये या दोघांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. आज (दि.14) सिन्नर न्यायालयात दोघांनाही हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. हवालदार रामनाथ देसाई, शहाजी शिंदे तपास करीत आहेत.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!