Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मुथूट फायनान्स गोळीबार प्रकरणी उत्तर प्रदेशातून दोन संशयित ताब्यात?

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक पोलिसांच्या युनिट २ ने परराज्यातून दोघा संशयितांना ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असून अद्याप कुठलीही माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.

ताब्यात घेतलेले संशयित मुथुट फायनान्स गोळीबार प्रकरणातील असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. दोघेही संशयित परप्रांतीय असून त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होत आहे.

दोन्ही संशयित मुथूट फायनान्स येथे झालेल्या गोळीबारातीलच आहेत की, इतर गुन्ह्यातील आहेत याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. लवकरच पोलीस प्रशासन याबाबत माहिती देईल असे सांगण्यात आले आहे.

पप्प्या व जितेंद्र सिंग अशी या संशयितांचे नाव असल्याचे समजते. त्यांना उत्तर प्रदेशातून घेण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!