दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू : एक राहात्याचा

0
नाशिक (प्रतिनिधी) – तालुक्यातील काल दुपारी चार वाजेच्या सुमारास नाशिकहून त्र्यंबकला सहलीसाठी गेलेल्या दोन इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांचा डोहात बुडून मृत्यू झाला.
या विद्यार्थ्यांची नावे संग्राम शिरसाठ (वय 24, रा. गंगापूररोड, नाशिक) व कौस्तुभ भिंगारदिवे (वय 26, राहता, जि. नगर) अशी आहेत. नाशिकमधील एका महाविद्यालयात हे विद्यार्थी इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होते.पावसाळ्यात त्र्यंबक परिसरात सहलीच्या निमित्ताने हे विद्यार्थी आले होते. पोहण्यासाठी येथील केटी बंधार्‍यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्नात दोघेही डोहात बुडाले.

LEAVE A REPLY

*