Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मध्यरात्री मालेगाव बस स्थानकावर दोन बस पेटल्या; कारण अस्पष्ट

Share

मालेगाव l प्रतिनिधी
मालेगाव बस स्थानकावर उभ्या असलेल्या बसने अचानक पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली होती. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आगीचे कारण समजू शकले नाही.

सटाणा आजाराची बस मालेगावच्या नवीन बसस्थानकानजीक उभी होती. अचानक बसने पेट घेतल्यानंतर शेजारी उभ्या असलेल्या बसलाही आग लागली होती.

एकाच वेळी दोन एसटीने अचानक पेट घेतल्याचे पाहून उपस्थितांची धावपळ उडाली होती. आगाराची एम एच ०७ सी ९१६ तर दुसरी वैजापूर आगाराची एम एच २० बी.एल.२६१९ होती दोन्ही एसटी बस मुक्कामी होत्या.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र तो प्रयन्त दोन्ही बस जळल्या होत्या. दोन्ही बसमध्ये प्रवासी व वाहक-चालक नसल्याने जीवितहानी टळली.

आगीचे कारण अस्पष्ट असून आग लागली की लावण्यात आली या बाबत उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!