साकूरमधील दोन शाळकरी मुले बेपत्ता

0
संगमनेर (प्रतिनिधी)-तालुक्यातील साकुर येथे ‘शाळेत जातो’ असे सांगून घराच्या बाहेर पडलेली सोळावर्षीय दोन मुले बेपत्ता झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची खबर दाखल झाली आहे.
चैतन्य भाऊसाहेब पिंगळे, किरण जयवंत भालेकर अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. याबाबत जयवंत रामभाऊ भालेकर यांनी घारगाव पोलिस ठाण्यात खबर आहे. दि. 28 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ‘शाळेत जातो’ असे सांगून नेहमीप्रमाणे सदर मुले घराबाहेर पडली होती. मात्र ती सायंकाळी घरी न परतल्याने, त्यांच्या पालकांनी त्यांचा नातेवाईक व ओळखीच्या ठिकाणी तपास केला मात्र ती मिळून न आल्याने, किरण भालेकर याच्या वडीलांनी रविवारी सायंकाळी घारगाव पोलिस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याची खबर दिली. घारगाव पोलीस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बेपत्ता मुलांचा शोध घेतला जात आहे. तरी सदर मुले कुठे दिसून आली तर घारगाव पोलिस ठाण्याशी 02425-270533, 9665245295 संपर्क साधावा असे आवाहन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*