Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मागील नऊ दिवसांत नाशिकमध्ये पेट्रोल दोन रुपयांनी महागले

Share

नाशिक  | प्रतिनिधी 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीचे पडसाद शहरांतील पेट्रोल दरावर उमटण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या नऊ दिवसांत जवळपास १ रुपये आणि ९० पैशांनी नाशिकमधील पेट्रोलचे दर वधारले आहेत. दरदिवशी होणारी पेट्रोल दरवाढ ग्राहकांच्या लक्षात आली नसली तरी गेल्या नऊ दिवसांत पेट्रोल प्रतिलिटरमागे १ रुपये ९० पैशांनी महागले आहे.

गेल्या आठवड्यातील सोमवार (दि. १६) वगळता प्रत्येक दिवशी पेट्रोलच्या ८ ते २९ पैशांपर्यंत वाढ झालेली दिसून येत आहे. येत्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

पुढच्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या भावात १० डॉलरनी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात ब्रेंट क्रुड ऑईलचा भाव ६३.४० डॉलर प्रती बॅरल आणि डब्ल्यूटीआय क्रुड ऑईलचा भाव ५८.९६ डॉलर प्रती बॅरल होता. त्यामुळे इंधनदरवाढ होण्याची शक्यता आहे.

 

दिनांकपेट्रोलचे दरअसे वाढले दर
सप्टेंबर 23, 201979.97 ₹/L+0.28
सप्टेंबर 22, 201979.69 ₹/L+0.27
सप्टेंबर 21, 201979.42 ₹/L+0.28
सप्टेंबर 20, 201979.14 ₹/L+0.34
सप्टेंबर 19, 201978.80 ₹/L+0.29
सप्टेंबर 18, 201978.51 ₹/L+0.25
सप्टेंबर 17, 201978.26 ₹/L+0.13
सप्टेंबर 16, 201978.13 ₹/L0.00
सप्टेंबर 15, 201978.13 ₹/L+0.06
सप्टेंबर 14, 201978.07 ₹/L+0.08
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!