Thursday, May 2, 2024
Homeनाशिकदोन अल्पवयीन मुलींचा विवाह करणार्‍या वर्‍हाडींना अटक

दोन अल्पवयीन मुलींचा विवाह करणार्‍या वर्‍हाडींना अटक

दिंडोरी । प्रतिनिधी

तालुक्यातील रवळगाव येथील दोन अल्पवयीन मुलींचे विवाह पैशाचे आमिष दाखवीत पळवून नेऊन कुटुंबियांच्या संमतीविना करू पाहणार्‍या येवला तालुक्यातील दोन विवाहोच्छुक वरांना व त्यांच्या कुटुंबियांना रवळगाव ग्रामस्थ व दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी दिंडोरी पोलिसांच्या ताब्यात दिले….

- Advertisement -

रवळगाव येथील आदिवासी समाजातील दोन अल्पवयीन गरीब घरातील मुलींचा विवाह येवला तालुक्यातील कासारखेडे व सावरगाव येथील विवाहेच्छुक तरुणाशी लावून देण्यासाठी रवळगाव येथील एक महिला व येवला तालुक्यातील एजंट दशरथ गंगाधर पवार रा सावरगाव यांनी या दोन मुलींना त्यांच्या कुटुंबियांच्या संमतीविना फूस लावून पळवून नेत

कासारखेडे येथे येऊन गेले व तेथील दोन मुलांशी तुमच्या विवाह लावून देतो असे आमिष दाखवले या दोन मुलींना त्याच्या आई-वडिलांच्या संमतीशिवाय बळजबरीने लग्नासाठी घेऊन जात असल्याची माहिती रवळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गोकुळ टोगारे, सोमनाथ निंबेकर व रवळगाव ग्रामस्थ यांना लागली त्यांनी या दोन मुलींच्या घरी जात संबंधित महिला व दोन्ही वराकडील कुटुंबीयांना पकडून ठेवत दिंडोरी पोलिसांच्या हवाली केले.

यात अमोल दशरथ पवार,सौ सुनिता दशरथ पवार, अक्षय दशरथ पवार, योगेश गोरक्षनाथ घेगडे, वाल्मीक माधव घेगडे. गोकुळ सखाराम जाधव, सागर पोपट, गायकवाड, संजय निवृत्ती घेगडे, गोरख सखाराम घेगडे, एकनाथ अशोक गायकवाड, रामेश्वर संजय गायकवाड, रामदास नामदेव गायकवाड जनाबाई गोरक्षनाथ घेगडे, सीमा ज्ञानेश्वर बोरसे, ज्ञानेश्वर काशिनाथ बोरसे, हे सर्व रा कासारखेडे ता येवला, तसेच अण्णा बारकू मलिक मीना अण्णा मलिक रा दहेगाव ता नांदगाव तसेच वाहन चालक कासम राजू पठाण रा विसापूर ता येवला या 20 जणांचा समावेश आहे.

याबाबतची खबर दिंडोरी पोलिसांना मिळताच दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण व त्यांचे कर्मचारी यांनी रवळगाव येथे जात वरील 20 जणांना ताब्यात घेतले दिंडोरी पोलीस स्थानकात त्यांच्या विरुद्ध मुलींच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या