Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नवीन नाशिक : टिप्पर गॅंगचे दोघे तडीपार

Share

नाशिक | प्रतिनिधी

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बहुचर्चित टिप्पर गॅंगमधील दोघांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.  समीर उर्फ छोटा पठाण नासीर पठाण (वय, ३२, रा. एन ५१/एसएफ०१/२२/३, शिवपुरी चौक सिडको व नागेश भागवत सोनवणे (वय, ३३, रा. रूम नंबर १२, रिंकी स्नाकुलजवळ, उपेन्द्रनगर सिडको) अशी दोघांची नावे आहेत.

गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी आणि आगामी निवडणुका, सण उत्सव भयमुक्त साजरी करता यावेत यासाठी परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी वरील दोघांच्या हद्दपारीचा आदेश आज काढला.

त्यांच्या विरोधात धमक्या, अंबड पोलीस ठाण्याअंतर्गत २०१२ या वर्षातील बहुचर्चित गुन्ह्यातील वरील संशयित मुख्य आरोपी होते. शहरात मोक्काची कारवाईदेखील याच गंगच्या विरोधात करण्यात आली होती.

शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी सध्या वेशातील पोलीस म्हणून पोलिसांना निर्भीडपणे माहीती देऊन पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!