दोन लाखांची सुगंधित तंबाखू व पानमसाला जप्त

0

नाशिक | घोटी येथील पानटपरी व्यावसायिकच्या वाहनातून तब्बल दोन लाखांची सुगंधित तंबाखू आणि विमल पानमसाला म्हसरूळ पोलिसांनी जप्त केला. अन्न व औषधे विभागाकडून माल ताब्यात घेऊन तपास सुरु असून म्हसरूळ पोलिसांनी वाहनचालकास ताब्यात घेतले आहे.

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी लावण्यात आली होती.  म्हसरूळ पोलीस ठाण्याला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कळसकर नगर याठिकाणी कोरोलो कर (क्र. एमएच ०३ झेड ४०६८) हे वाहन थांबवून चालक हनीफ बिलाल शेख (वय २८, रा. मिरची गल्ली, घोटी, ता. इगतपुरी) चौकशी केली.

त्यात त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वाहनाची तपासणी केली. बंदी असलेला दोन लाख नऊ हजार रुपयांची सुगंधित तंबाखू आणि पानमसाला जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी चालकास ताब्यात घेऊन म्हसरूळ पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. त्यानंतर अन्न व औषध विभागमधील के.एच. बाविस्कर, पी.एस.पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी व मनपा अन्न सुरक्षा अधिकारी बी.सी.इंगळे यांनी याठिकाणी येऊन पंचनामा केला. तसेच चालक आणि जप्त केलेला माल पुढील तपासासाठी ताब्यात घेतला आहे.

LEAVE A REPLY

*