Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

दोन लाख 17 हजार मे.टन खतसाठा खरिपासाठी मंजूर

Share
  • नऊ हजार 708 क्विंटल बियाणाची मागणी
  • जि.प.कृषी विभागातर्फे तयारी सुरू

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे सन 2019 साठी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे.यंदा खरीपासाठी सहा लाख 33 हजार 721 हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.खरीपासाठी सर्व प्रकारचे बियाणे मिळून 9 हजार 708क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे.तसेच जिल्हयासाठी शासनाने दोन लाख 17 हजार 480 मेट्रिक टन रासायनिक खतांचा साठा मंजूर केला आहे.

गतवर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाच्या क्षेत्रात मोठ्याप्रमाणात घट झाली होती.येत्या खरिप हंगामात मात्र, हवामान खात्याने चांगला पावसाचा अंदाज वर्तविला आहे.खरीप हंगामात विविध पिकाखाली सहा लाख 33 हजार 721 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे लक्षांक शासनाने दिले आहेत.

जिल्हयात प्रामुख्याने भात, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस व इतर कडधान्य ही मुख्य पिके हंगामात घेतली जातात. खरीप हंगाम 2019 साठी बियाणे व खते यांची मागणी शासनाकडे नोंदविली असून मागणीनुसार जिल्हयात बियाणे व खते उपलब्ध होत आहे.

जिल्हयासाठी सर्व प्रकारचे बियाणे मिळवून 9 हजार 708 क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे तसेच जिल्हयासाटी शासनाने दोन लाख 17 हजार 480 मेट्रिक टन रासायनिक खतांचा साठा मंजूर केला आहे.

13 मे 2019 अखेर रब्बी हंगाम 18-19 मधील शिल्लक साठा व जिल्हयातील घाऊक व किरकोळ विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेला खत साठयासहित एकूण एक लाख 15 हजार मेट्रीकटन खताचा जिल्हयात सद्यस्थितीत उपलब्ध आहे. आज अखेर सोयाबीनचे 5 हजार 500क्विंटल बियाणे व भाताचे एक हजार 500क्विंटल बियाणे महाबीज यंत्रणेकडे प्राप्त झाले आहे.अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी रमेश शिंदे यांनी दिली.

16 भरारी पथके

मे महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांचा जिल्हयात बियाणे पुरवठा सुरू होईल. शेतकर्‍यांना बियाणे व खत खरेदी करताना काळजी व दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. जिल्हयातील शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्वक दर्जेदार योग्य किंमतीत व वेळेत कृषी निविष्ठा मिळवण्याकरता त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर एक तालुकास्तरावर पंधरा-सोळा भरारी पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. तालुकास्तरावरील भरारी पथकामध्ये तालुका कृषी अधिकारी हे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील.

तसेच कृषी अधिकारी, पंचायत समिती निरीक्षक, वजनमाप मंडळ, कृषी अधिकारी हे सदस्य व कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे सचिव म्हणून कामकाज करतील. जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!