Friday, April 26, 2024
HomeUncategorizedभडगाव : अपघातात दोघांचा मृत्यू

भडगाव : अपघातात दोघांचा मृत्यू

भडगाव  –

चाळीसगाव रस्त्यावर कोठली फाट्याजवळ गाडीचा अपघात झाल्याची घटना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघात दोन जणांचा मृत्यु झाल्याची माहीती समोर आली आहे. तर तिन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी पाचोरा येथे हलविण्यात आले आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेली माहिती अशी की नगरदेवळा स्टेशनकडुन भडगाव कडे येणाऱ्या कारचा अपघात झाला. त्यात हरीष पाटील व योगेश भोसले नामक व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे ग्रामीण रूग्नालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

तर तीन जण गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी पाचोरा येथे दाखल करण्यात आल्याची माहीती मिळाली आहे. हा अपघात नेमका कसा झाला हे समजु शकले नाही. भडगाव पोलिस स्टेशन ला उशिरापर्यंत नोंद घ्यायचे काम सुरू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या