त्र्यंबकेश्वरमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू

0

त्र्यंबकेश्वर (मोहन देवरे) :  त्र्यंबकेश्वर तालुक्यात वाघुल येथे काल विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वाघुल पाडा येथे शेतात काम करत असतांना वीज पडून दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सोनीबाई पुंडलिक  आंबेकर  व त्यांचा धाकटा मुलगा अरुण आंबेकर हे अंगावर कोसळल्याने जागीच ठार झाले. याच ठिकाणी त्यांचा मोठा मुलगा भाऊराव हा या घटनेत जखमी झाला आहे.
दरम्यान, संबंधित कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याचे त्यांना शासनाकडून मदत मिळाली अशी मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*