अभोण्यात सराफ पेढी फोडली २ किलो चांदीसह २ लाखांचा ऐवज लंपास

0
अभोणा | दि. ६ प्रतिनिधी – अभोणा येथील मुख्य बाजारपेठेतील गणेश ज्वेलर्सच्या मागच्या दरवाजातून प्रवेश करून २ किलो चांदीसह अन्य वस्तूंची चोरी झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.  माऊली ज्वेलर्समध्ये चोरीचा प्रयत्न फसला. मध्यरात्री ही चोरी झाली.

अभोणा चौफुलीवरून गावात जाणार्‍या मेनरोडवरील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पृथ्वीराज जाधव यांच्या मालकीचे गणेश ज्वेलर्स आहे. २ किलो चांदी, जोडवे, तोरड्यांसह अन्य २ लाखापर्यंतचे दागिने लंपास करून चोरटे फरार झाले. जवळच असलेल्या उमेश दुसाने यांच्या माऊली ज्वेलर्सचे कुलूप न तोडता कडीचा कोपरा कापून शटर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र शटर आतून बंद असल्याने चोरीचा प्रयत्न फसला.

ज्या दुकानात चोरी झाली तेथे सीसीटीव्ही नसल्याने पोलीस यंत्रणेने नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी अभोणा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, रचना हाऊसिंग सोसायटीत एकाच रात्रीत दोन घरात चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा चोरी झाल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या सोसायटीतील चव्हाण यांच्या घरातील ७३ हजारांचे सोने चोरून चोरटे फरार झाले होते. मात्र अभोणा पोलिसांना याही चोरीचा थांगपत्ता न लागल्याने लवकर चोरट्यांना शोधावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

सीसीटीव्ही गरजेचे
गणेश ज्वेलर्स या दुकानात झालेल्या चोरीसह मागील महिन्यात झालेल्या चोरीचाही तपास सुरू आहे. मात्र गावातील ज्वेलर्स व इतर व्यावसायिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे काळाची गरज असल्याने व्यावसायिकांनी सीसीटीव्ही व सेन्सर यंत्र बसवावे .
-राहुल फुला, सहायक पोलीस निरीक्षक

LEAVE A REPLY

*