Type to search

सिन्नर : गर्दीमुळे बिबट्या चवताळला; मऱ्हळ येथे दोघे गंभीर

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : गर्दीमुळे बिबट्या चवताळला; मऱ्हळ येथे दोघे गंभीर

Share

सिन्नर | वार्ताहर

तालुक्यातील मऱ्हळ येथे आज (दि.५) सकाळी 6 वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जखमी झाल्याची घटना घडली.
परिसरातील शेळके वस्तीजवळ पुलाखाली असणाऱ्या सिमेंटच्या नळीत बिबट्या दडून बसला असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले.

ही बातमी गावभर पसरल्यावर शेकडोच्या संख्येने तेथे जमाव जमला होता. बिबट्या पुलाखाली असल्याची माहिती वनविभागाला कळवण्यात आली.

बिबट्या जेरबंद करता यावा यासाठी काही शेतकऱ्यांनी बोरीच्या फांद्या टाकून पुलाच्या दोन्ही बाजूनी नळीचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र यामुळे चवताळलेल्या बिबट्याने बाहेर धाव घेतली.

यावेळी नळीच्या तोंडाशी असलेले छोटू परदेशी, रामनाथ शेळके हे दोघे जखमी झाले, बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याने दोघांच्याही पाठीला पंजा मारला. यावेळी उपस्थितांची पळापळ होऊन बिबट्या देखील पसार झाला.

रात्री अन्न-पाण्याच्या शोधात बिबट्या या भागात आला असावा, मात्र दिवस उजाडु लागल्यावर तो पुलाखाली आश्रयाला बसला असल्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!