Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

वावीजवळ अपघात; दुचाकीस्वारासह मुलगा जखमी

Share

पंचाळे | वार्ताहर

सिन्नर शिर्डी मार्गावर वावीजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघात इतका भयंकर होता की, दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे. जखमी दुचाकीस्वारास सिन्नर शहरातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, आज दुपारी दोन वाजता सिन्नर-शिर्डी महामार्गावर वावी पासून अर्धा किलोमीटर अलीकडे लहान मुलासह हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच 15 ए जे 1626 ने जात होते. दुचाकीवर डीझेलचा ड्रम अडकवला होता.

ते कोपरगाव येथील जनार्दन स्वामी आश्रमात जाण्यासाठी निघाले होते. त्यांची दुचाकी वावीजवळ आली असतानाचा त्यांच्या दुचाकीला वावी येथील एका कारने धडक दिली.

या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला तर मुलालाही जखम झाली आहे.  मुलावर वावी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर दुचाकीस्वारास सिन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताची नोंद वावी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!