Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : स्मार्टरोडमुळे ऐन सणासुदीत बाजार ठप्प; एमजीरोडवर व्यापाऱ्यांचा बंद

Share

नाशिक | प्रतिनिधी 

शहरात सुरु असलेल्या स्मार्टरोडच्या कामामुळे शहरातील वर्दळीची महात्मा गांधी रोडवरील बाजारपेठे संकटात सापडली आहे. ऐन दसरा दिवाळीत ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे व्यावसायिकांची नाराजी असून आज स्मार्टरोडच्या कामात होत असलेल्या दिरंगाईचा निषेध म्हणून येथील व्यावसायिकांनी दोन तास बाजारपेठ बंद ठेवून निषेध केला. यावेळी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी निवेदन देऊन नाराजी व्यक्त केली.

गेल्या दोन वर्षांपासून नाशिकमध्ये स्मार्टसिटी अंतर्गत स्मार्ट रोडचे काम केले जात आहे. कालावधी पूर्ण होऊनदेखील अद्याप काम प्रगतीपथावरच आहे. रस्ते बंद असल्यामुळे ग्राहकांची धांदल उडते, तर नो पार्किंगमध्ये वाहने पार्क केली तर पोलीस कारवाई करतात. त्यामुळे या बाजारपेठेकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.

दिवाळी म्हटली की, खरेदीचा काळ असतो; दरवर्षी येथील बाजारपेठेतून मोठी उलाढाल दसरा आणि दिवाळी काळात होत असते.  मात्र, स्मार्टरोडच्या कामामुळे या परिसरातील वाहतूक गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे.

याठिकाणी दसर्यालाही खरेदीसाठी ग्राहकांनी  प्रतिसाद दिला नाही तर दिवाळी तोंडावर आली तरीदेखील ग्राहक एमजीरोडकडे वळलेले दिसून येत नाहीत.

त्यामुळे स्मार्टसिटीच्या नावाखाली येथील व्यावसायिक तसेच ग्राहकांना वेठीस धरले जात असून याचा निषेध म्हणून व्यावसायिकांनी आज दुपारी तीन वाजेपासून पाच वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवून प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचा निषेध व्यक्त केला.

दुपारी चार वाजेच्या सुमारास येथील व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेत नाराजी व्यक्त करत निवेदन दिले.

दरम्यान, या व्यावसायिकांना कुठलेही ठोस आश्वासन आयुक्तांकडून देण्यात आले नाही. पुढील दोन दिवसांत हा रस्ता सुरु करावा अन्यथा येथील व्यावसायिक तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा व्यावसायिकांनी दिला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!