Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोपरगावात धुमश्‍चक्री, तिघे गंभीर जखमी

Share

भररस्त्यात हत्यारांचा वापर, सात जणांवर गुन्हा

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – कोपरगाव शहरात जब्रेश्वराचे मंदिरालगत स्वामी समर्थ मंदिराच्या समोर दोन गटात (मावसभावासोबत) झालेल्या भांडणाचा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत तिघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. याबाबत राहुल संजय माळी (वय-18) रा. मोहिनीराजनगर याने आरोपी योगेश गायकवाड, पाप्या पूर्ण नाव माहित नाही. महेश गायकवाड, सचिन गायकवाड, विशाल गायकवाड, शंकर मोरे, निलेश पवार सर्व रा.गांधीनगर, कोपरगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, ही घटना भररस्त्यात तलवारी सारख्या हत्यारांचा वापर घडल्याने दोन्ही बाजूनी रस्ता बंद होऊन जाणार्‍या येणार्‍या प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.पोलिसांनी अशा आरोपींचा कडक कारवाई करून बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

21 सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी राहुल माळी याचा मावस भावासोबत झालेल्या भांडणाचा जाब विचारलेच्या कारणावरून यातील आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून पूर्व नियोजित कट करून फिर्यादीस फोन करून बोलावून घेऊन तू आम्हाला शिवीगाळ का केली असे म्हणून आरोपी योगेश गायकवाड याने राहुल माळी याच्या डोक्यात रॉड मारून आरोपी पाप्या याने फिर्यादीच्या पोटात दगड मारून फिर्यादीला खाली पाडले त्यास सुरज कैलास आव्हाड हा सोडविण्यास गेला असता आरोपी महेश गायकवाड याने सुरज याच्या डोक्यात तलवारी सारख्या हत्याराने वार केला.त्यामुळे तो जखमी झाला. ते पाहून विठ्ठल रोहकले हा मदतीसाठी आला असता आरोपी सचिन गायकवाड याने शॉकपच्या रॉडने पायावर मारून दुखापत केली.व बाकीच्या इतरांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून आरोपीनी फिर्यादी व त्याच्या साथीदारांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

याघटनेवरून कोपरगाव शहर पोलिसांनी गु.र.नं.326/2019 भादंवि.कलम.326,324,323,143,147,149,120,(ब)504,506,तसेच भारतीय हत्यार कायदा 4/25 प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या घटनेत फिर्यादी राहुल माळी, सुरज आव्हाड,विठ्ठल लोहकरे रा.मोहिनीराजनगर हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप बोरसे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!