Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मालेगाव : विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू; बालक गंभीर

Share

मालेगाव । प्रतिनिधी

मालेगावात दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. यात पहिली घटना चंदनपुरी गेट-मरिमाता मंदिर रस्त्यावरील बोहरा कब्रस्थानसमोर पथदीपाची वीजेने प्रवाहीत रस्त्यावर पडलेल्या तारेवर पाय पडल्याने बारावर्षीय मुलगा गंभीररित्या जखमी झाला. तर वीजेने प्रवाहीत खांबास पकडल्यामुळे 64 वर्षीय वृध्दास आपले प्राण गमवावे लागले. आज मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

शकील अहमद मुक्तार अहमद अन्सारी (64, रा. गुलशेरनगर) हे त्या वीजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडलेल्या वृध्दाचे नाव असून मोहंमद यासीन एकबाल अहमद (12, रा. हिरापुरा) या जखमी बालकावर सामान्य रूग्णालयात उपचार केले जात आहे.

काल रात्री चंदनपुरी गेट रस्त्यावरून शकील अहमद व मोहंमद यासीन हे दोघे जात असतांना अंधारामुळे पथदीपाच्या वीजेने प्रवाहीत रस्त्यावर पडलेल्या तारेवर दोघांचे पाय पडल्याने मो. यासीन वीजेचा झटका बसल्याने फेकला जावून बेशुध्द पडला तर वीजेचा झटका बसताच शकील अहमद यांनी जवळच असलेल्या वीजेच्या खांबास पकडले मात्र दुर्दैवाने या खांबात देखील वीजप्रवाह उतरला असल्याने ते जबर धक्का बसून जागीच ठार झाले.

सदर प्रकार रस्त्यावरून जात असलेल्या नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत शकील अहमद व मो. यासीन यांना तातडीने रिक्षात घालून सामान्य रूग्णालयात उपचारार्थ हलविले. डॉक्टरांनी तपासणी केली असता शकील अहमद हे मृत असल्याचे घोषीत केले. तर जखमी मो. यासीनवर तातडीने उपचार केले गेले. आझादनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

जीर्ण तारांनी घेतला बळी

परिसरात वीजेच्या खांबावरील तारा अत्यंत जीर्ण होवून अक्षरश: लोंबकळत आहेत. वीज वितरणने या तारांची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरीकांतर्फे सातत्याने केली जात होती. मात्र सदरची दुरूस्ती केली न गेल्यामुळे लोंबकळत असलेली तार हवेने तुटून वृध्दाचा बळी गेल्याचा आरोप नागरीकांतर्फे केला गेला. याप्रकरणी दोषी असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संतप्त नागरीकांतर्फे केली जात होती.

तर दुसऱ्या घटनेत निमगुले मुठे येथील पोपट गबाजी कदम हे शेतकरी काल दुपारी शेतात वीजपंप सुरु करण्यासाठी गेले असता विजेचा धक्का बसून जागीच ठार झाले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!