सिन्नर : खोपडी गावाजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

0

सिन्नर , वार्ताहर

सिन्नर -शिर्डी महामार्गावर आज (दि. 14) सकाळी 7: 30 वाजेच्या सुमारास ड्युटी संपवून दुचाकीवरून घराकडे परतणाऱ्या दोघा औद्योगिक कामगारांचा कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना खोपडी गावाजवळ घडली.

अपघातात मयत झालेले दोघेही कामगार मुसळगावच्या सुपर इंडस्ट्रीज मध्ये कामाला होते. ते दोघेही वावीपरिसरातील रहिवाशी आहेत.

अनंत नवनाथ यादव (32) व पांडुरंग नामदेव पवार (33) हे दोघे रात्रपाळी संपवून दुचाकीवरून गावाकडे परत येत असताना खोपडी गावाजवळ असलेल्या दत्त मंदिराच्या जवळ त्यांच्या दुचाकीला समोरून भरधाव येणाऱ्या स्विफ्ट कारने धडक दिली.

या अपघात दोघांनाही गंभीर इजा होऊन त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या दोघा तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे वल्हेवाडी, कहांडळ सह वावी परिसरावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

*