Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जुने नाशिक : अवघ्या दोन महिन्यांवर होते लग्न; आडगांव येथील अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Share
अवघ्या दोन महिन्यांवर होते लग्न; आडगांव येथील अपघातात जुन्या नाशिकमधील दोघांचा दुर्दैवी मृत्यू, two dies in an accident at adgaon breaking news latest news

जुने नाशिक | प्रतिनिधी

आपल्या दुचाकीवर नाशिककडे येणार्‍या जुने नाशिकच्या दोघा तरुणांच्या गाडीला आडगांव येथे महामार्गावर पाठीमागून आलेल्या एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन्ही तरुण सामाजिक कार्यात अग्रसेर रहायचे. एकाचा तर दोन महिन्यांनी लग्न होणार होता. या घटनेमुळे जुने नाशिक परिसरात शोककळा पसरली होती.

या घटनेत हाजी मलंग बागवान (वय ४०, रा काजीगढी, जुने नाशिक) व अझहर इलियास सय्यद (वय २७, रा. नाईकवाडीपुरा, जुने नाशिक) या दोघा तरुणांना मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.२०) रात्री नऊ वाजेच्या सुमारास अपघात झाला. दोघे कामासाठी ओझरला घेले होते. त्यांचा काम आटोपून मुंबई-आग्रा महामार्गाने ते परतत असताना आडगावजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या धडकेत दोघे युवक जागीच ठार झाले. अपघाताची बातमी रात्री जुन्या नाशकात येताच संपुर्ण जुने नाशिक भागात शोककळा पसरली होती. रात्री नऊ वाजेच्या सुमारास नाशिककडे ऍक्टिवा दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार पाठीमागून भरधाव जाणार्‍या वाहनाने अझहर व मलंग या दोघांना चिरडले.

अझहर चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मलंग यांचा उपचारादरम्यान जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने संपुर्ण जुन्या नाशकात हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपुर्वीच अझहरने ऍक्टीवा दुचाकी खरेदी केली होती. अद्यापपर्यंत दुचाकीला क्रमांकदेखील आरटीओकडून मिळालेला नव्हता. तत्पुर्वीच काळाने या दोघांवर घाला घातला. मलंग यांनी डोक्यावर हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवित होते व अझहर हा त्यांच्यासोबत पाठीमागे बसलेला होता, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मलंग यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.


२ महिन्यात लग्न होते

अझहर सय्यदचा नुकताच साखरपुडा झाला होता, तर येत्या दोन महिन्यांमध्ये त्याचा लग्न होणार होते. त्याच्या निधनाने अनेकांना मोठा धक्का लागला. दोघे तरुण खासगी कंपनीत होते. अशी माहिती मिळाली आहे. बागवान यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक लहान मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!