Type to search

नाशिक : विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात विजेचा शॉक लागल्याने वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटना मंगळवारी (दि 14) घडल्या. एकजण नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घरावर पत्रे फिट करीत होता, तर दुसरा पाणी मारीत होता.

विद्युत वाहिनीस धक्का लागल्याने दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी ओझर आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोमनाथ भारत दिवे (25 रा. हिवरगाव ता. सिन्नर) मंगळवारी (दि.14) सकाळी सुशिला साळवे (रा. दिक्षी ता. निफाड) यांच्या घराच्या बांधकामावर पत्रे फिट करीत असताना विजेच्या तारेस लोखंडी अँगलचा धक्का लागल्याने जमिनीवर कोसळला.

अरविंद दिवे यांनी त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी ओझर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसर्‍या घटनेत गंगावाडी (पो. लाखलगाव) येथील शरद अंबादास वळवे (24) हा युवक बांधकाम सुरू असलेल्या आपल्या घरावर पाणी मारत असताना घरावरून गेलेल्या वीज तारेस त्याचा धक्का लागला.

यामुळे शॉक बसून तो गंभीर भाजला गेला. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. नाशिकरोड पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!