Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

बेलापुरात दोन मृतदेह आढळले ; एकाची आत्महत्या

Share

बेलापूर (वार्ताहर) – बेलापूर पढेगाव रोडवर असणार्‍या कानिफनाथ मंदिराजवळच्या काटवनात एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली. तर बेलापूर श्रीरामपूर रस्त्यावर एक वयोवृध्दांचा मृतदेह आढळून आला आहे. आत्महत्या करणार्‍या तरुणाबाबत नागरिकांत उलट-सुलट चर्चा सुरु आहे.

बेलापूर येथील रविंद्र अरुण पाटोळे (वय 26) याने पढेगाव रस्त्यावर असणार्‍या कानिफनात मंदिराजवळ असणार्‍या काटवनात झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. या बाबतची फिर्याद मयताचा भाऊ सुभाष पाटोळे याने बेलापूर पोलिसांना दिली. रविंद्र यांने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजले नाही.

घटनेची माहिती समजताच पोलीस हवालदार अतुल लोटके व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत रविंद्र यास तातडीने साखर कामगार हॉस्पीटलला हलविले परंतु वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषीत केले. बेलापूर पोलीसांना आणखी एक मृतदेह आढळून आला. पुढील तपास हवालदार लोटके हे करत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!