Photo Gallery : ‘एचसीजी मानवता’च्या दोन दिवसीय कॅन्सर परिषदेला शेकडो महिलांचा प्रतिसाद

0
नाशिक | स्तन कॅन्सरचे वाढते प्रमाण तसेच या विषयात होत असलेले संशोधन, कॅन्सर रुग्णांसाठी उपयोगी ठरणारे योग, कलर थेरपी अशा अनेक विषयांची चर्चा करण्यासाठी  नाशिकमध्ये दोन दिवसीय परिषद भरविण्यात आली होती. स्तन कॅन्सरपासून मुक्त झालेल्या महिलांच्या परिषदेचे आयोजन एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरतर्फे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर, नगर, अकोला येथील अनेक महिलांची उपस्थिती होती.

या परिषदेला शनिवारी (दि.२५) सुरुवात झाली. आधुनिक उपचारांची आणि बदलत्या तंत्रज्ञानाची चर्चा यावेळी करण्यात आली. या परिषदेसाठी डॉ. भूषण झाडे, डॉ. शोना नाग, डॉ. अनुपमा माने, डॉ. प्रांजली गाडगीळ  यांच्यासह डॉ. राज नगरकर, डॉ. विजय पालवे, डॉ विजयालक्ष्मी  गणोरकर यांच्यासह अनेक तज्ञांनी सहभाग घेतला.

किमोथेरपी परिणाम आणि दुष्परिणाम, स्तन गमावलेल्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पुन:रर्चना करणे, फ़िजिओथेरपीची माहिती तज्ञांनी सांगितली तसेच यावेळी अनेक रुग्णांच्या शंकेचे निरसनदेखील यावेळी उपस्थित तज्ञांनी केले.

आज दुसऱ्या दिवशीच्या सत्रात डॉ. मैथिली काश्यपे यांचे त्वचा व केसांची काळजी या विषयारील मार्गदर्शन पार पडले. त्यानंतर कॅन्सर रोखण्यासाठी संस्था व शासकीय स्तरावर होणारे प्रयत्न या विषयावर सिव्हील सर्जन डॉ. जगदाळे, जिल्हा परिषदेतर्फे डॉ वाघचौरे, आयएमए अध्यक्ष मंगेश थेटे आणि डॉ. शिंदे यांनी माहिती सांगितली.

योगासनांचा जागतिक विक्रम करणाऱ्या प्रज्ञा पाटील,  सोनाली जोशी यांचे आर्ट थेरपीचे सत्र यावेळी पार पडले. ही परिषद भरवण्यामागची भूमिका डॉ. राज नगरकर यांनी मांडली.  नाग फौंडेशन पुणे येथील डॉ. शोना नाग यांनी यावेळी उपस्थितांचे स्वागत केले.

कॅन्सरचे उपचार सुरु असूनदेखील उत्तम जीवन जगत असलेल्या मुग्ध सातारकर, अर्चना लिमये व वंदना अत्रे यांनी आपले अनुभव सांगितले. यावेळी महिला आणि बालकल्याण विभागाच्या सचिव विनिता सिंगल यांनी महिला सबलीकरण विषयावर मार्गदर्शन केले.

दरम्यान, पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाचा समारोप आमदार सीमा हिरे  व विश्वास ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडला. संपूर्ण परिषदेचे सूत्रसंचालन रुचा मुले व वंदना अत्रे यांनी केले.

LEAVE A REPLY

*