दोन मुलांचा बुडुन मृत्यू

रामकुंडात बुडून एकाचा मृत्यू

0
नाशिक । दि. 13 प्रतिनिधी – शहरात रामकुंडात दुतोंड्या स्वराज सुनील बागुल (8, रा. जुने पंचवटी) असे पहिल्या घटनेत बुडालेल्या मुलाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वराज हा आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास पोहण्यासाठी रामकुंड परिसरात गेला होता. दोन दिवसांपुर्वीच गोदावरी नदीला पाणी सोडण्यात आले आहे.

त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो दुतोंड्या मारूती जवळ बुडाला. हे लक्षात येताच तेथील युवकांनी त्यास बाहेर काढून तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले परंतु तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषीत केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याच प्रकारे दुसरी घटना सातपूर, शिवाजीनगर परिसरात घडली. येथील नगरसेवक दिनकर पाटील यांच्या शेतातील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा यात बुडून मृत्यू झाला. अबिरल लालमल ्नलोन (रा. शिवाजीनगर) असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 8.30 च्या सुमारास इतर मुलांबरोबर अबिरल हा पोहण्यासाठी तलावात गेला होता. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. इतर मुलांनी त्यास शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत.

त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बाजूच्या नागरीकांनी धाव घेत त्याला पाण्याबाहेर काढले. त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषीत केले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*