त्र्यंबकेश्वरमध्ये दोन बस फोडल्या; एक जखमी

0

त्र्यंबकेश्वर (विशेष प्रतिनिधी) : त्र्यंबकेश्वरमध्ये शंबर टक्के बंदला प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबक बससेवा बंद करण्यात आली होती. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरीजवळ एका राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली.

आंबोली येथे येथेही  एक बसवर दगडफेक केल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये दगडफेक झाल्यामुळे दोन्ही बसेस चे नुकसान झाले आहे. या घटनेदरम्यान एक जन गंभीर जखमी झाल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होते आहे.

त्र्यंबकेश्वर बंदमुळे येथील पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले तसेच रुग्णवाहिकाही बंद झाल्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली.

तर बस स्थानक परिसरात प्रवाश्यांची प्रचंड गर्दी दिसून आली. मंदिर चौकात शिवसेनेकडून आलेल्या भाविकांना चहा पोंहे पाण्याचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

*