दोन दुचाकींच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

0
नाशिकरोड | नारायणबापू नगरकडून नाशिककडे जाणाऱ्या 2 दुचाकींच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातील दोन्ही दुचाकी भरधाव वेगाने जात असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिकडून देण्यात आली आहे.

अपघातात झालेल्या मृत व्यक्तीचे नाव जितेंद्र पगारे असल्याचे समजते.

टाकळी रोडवर हा अपघात झाला असून दुसऱ्या दुचाकीवरील दुचाकीस्वार जखमी झाल्याचे समजते. याबाबत अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही.

उपनगर पोलीस ठाण्यात अद्याप कुठलाही प्रकारची नोंद झालेली नसल्याची माहिती प्रतिनिधीकडून मिळाली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी याच ठीकाणी एका पोलीस अधिकाऱयाचा अपघातात मृत्यू झाला होता.

या अपघातातील मयताचा मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*