Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पंचवटी : अमृतधाम ते हिरावाडी पहाटे चार वाजता सुरू होता सिनेस्टाईल पाठलाग

Share

सातपूर येथून एटीएम फोडून पळ काढणाऱ्या दोघांना बेड्या; तीन फरार

पंचवटी l वार्ताहर

सातपूर परिसरातून एटीएम फोडून पळ काढणाऱ्या 5 संशयितांपैकी 2 जणांना पंचवटी पोलिसांनी हिरावाडी परिसरातील क्षीरसागर कॉलनी याठिकाणी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले आहे. अमृतधाम पासून हा पाठलाग सुरू होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

घटनेतील तिघे फरार झाल्याने घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौंजफाटा तैनात करण्यात आला होता.

हिरावाडी परिसरात पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. पोलीस विभागाचे सर्व अधिकारी, डॉग स्कॉडसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पहाटे ४ वाजेपासून थरारनाट्य होते. संशयितांकडे धारधार शस्त्रे देखील असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरात एटीएम फोडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यापार्श्वभूमीवर मोठ्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक के डी पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संदीप चोपडे, पोलीस हवालदार जी. जे पोटींडे, योगेश एम सस्कर, अरुण हाडस, पवार, नरवडे आदींनी केली.

 

Leave a Comment

error: Content is protected !!