Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : पेठ तालुक्यात एटीएम फोडणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

Share

नाशिक | प्रतिनिधी

पेठ तालुक्यात दोन दिवसांपूर्वी दोन संशयितांनी आय.डी.बीआय.बँकेचे ए.टी.एम.मध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून एटीएम मशिन हातोडी व स्क्रुड्रायव्हरने फोडुन रोख रक्कम चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता.

सदर घटनेबाबत आय.डी.बी.आय. बँक पेठ तालुका शाखेचे मॅनेजर श्रीकिरण नंदकिशोर विभांडीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

या घटनेनंतर पोलीस अधीक्षक आरती सिंग यांची बैठक झाली होती. बैठकीत गुन्हाची उकल करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आरोपींचा समांतर तपास सुरू होता.

एमटीएम फोडणारे संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यांचे वर्णन व पेहरावावरून स्थागुशाचे पथक व पेठ पोलिसांनी नाशिक शहरात शोध सुरु केला.

दरम्यान, खबऱ्यामार्फत प्राप्त झालेल्या माहितीनुसार एक संशयित संशयीत नासर्डी पुल परिसरात असल्याचे समजले. त्यावरून स्थागुशाचे पथक व पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचत संशयित राजेश बाळु खाणे, वय 28, रा.आंबेडकरवाडी, नासर्डीपुल, नाशिक यास शिताफिने ताब्यात घेतले. त्यास पोलिसी खाक्या दाखवताच  त्याचा साथीदार अंबादास पवार उर्फ
बंद-या यास बोधलेनगर परिसरातुन ताब्यात घेण्यात आले.

त्यांनी पेठ येथील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.  पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो गजाआड झाल्यामुळे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

स्थागुशाचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, पेठ पोलीस ठाण्याचे पोनि गाडे पाटील, स्थागुशाचे पोउनि संदिप कहाळे, सपोउनि रामभाउ मुंढे,
पोहवा हनुमंत महाले, प्रकाश तुपलोंढे, वसंत खांडवी, जे.के.सुर्यवंशी, भूषण रानडे, पोकॉ प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले, संदिप लगड, तसेच पेठ पोलीस ठाण्याचे सपोउनि भाउसाहेब उगले, पोना दिलीप रहिरे, पोका विजय भोये यांचे पथकाने नाशिक शहरातुन वरील आरोपीतांना ताब्यात घेवुन एटीएम चोरीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!