Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

भाडेतत्वावर चारचाकी घेऊन गहाण ठेवली जाई; दीड कोटींचा अपहार उघडकीस

Share

नाशिक | प्रतिनिधी 

चारचाकी वाहने भाडेतत्वावर घेऊन पुढे हीच वाहने गहाण ठेवत अपहार करणाऱ्या टोळीतील फरार संशयितास गुन्हे शाखा १ च्या युनिटने जेरबंद केले आहे. संशयिताकडून २८ लाख ९० हजार रुपये किंमतीची पाच वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. या कारवाईनंतर या प्रकरणातील एकूण ३६ वाहनांचा १ कोटी ६६ लाख ६० हजार रुपयांचा अपहार करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळ्यात यश आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शहरातील पखालरोड, अशोकामार्ग येथे राहणारे संशयित आवेश जिलानी कोकणी व फरहान जिलानी यांचे ओ.एम. टी. टूर्स ट्रव्हल नावाचे ऑफीस असल्याचे सांगत चारचाकी वाहने करारनाम्याने भाडेतत्वावर घेऊन चारचाकी परस्पर एजंटद्वारे मोठी रक्कम काढून वाहन गहाण ठेवून अपहार करत असत.

याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात २२ डिसेंबर २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासात फरहान जिलानी कोकणी व आवेश जिलानी कोकणी यांना दुसऱ्याच दिवशी अटक केली होती. तर दुसरा एजंट सम्सन पारखे याने धुळे येथे राहणाऱ्या भूषण सुर्वे याच्या मार्फत ओळखीतल्या लोकांना गहाण स्वरुपात देवून त्यांच्याकडून मोठ्या स्वरुपात रोख राक्का घेतल्या असल्याची माहिती समोर आली. तसेच गुन्ह्यातील अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांकडून ७७ लाख ७० हजार रुपये किंमतीची १२ चारचाकी वाहने जप्त करण्यात आल्या होत्या.

यातील तिसरा संशयित भूरया उर्फ भूषण सुर्वे यास धुळ्यातून १७ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले.त्याची विचारपूस केली असता त्याने जेलरोड येथे वास्तव्यास असलेल्या सम्सन पारखे याच्याकडून चारचाकी वाहने घेऊन ती वाहने परस्पर ओळखीतल्या लोकांना बेकायदेशीरपणे कमिशनपोटी गहन स्वरुपात ठेवल्याचे एकूण २८ लाख ९० हजार रुपये किंमतीची ०५ चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आली.

वरील चारही संशयितांकडून आतापर्यंत एकूण १ कोटी ६६ लाख ६० हजार रुपये किंमतीची २९ वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.

याप्रकरणातील मुद्देमाल हस्तगत  करत आतापर्यंत १२ चारचाकी वाहने एकूण ६० लाख रुपये किंमतीची वाहने परत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!