जिल्हा नियोजन समितीसाठी दोन अर्ज दाखल

0

नाशिक । दि. 23 प्रतिनिधी – जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी निफाडमधील देवगाव जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादीच्या सदस्या अमृता पवार यांनी दोन जागांसाठी दोन सादर केले .

त्यात एक सर्वसाधारण तर दुसरा अर्ज सर्वसाधारण महिला गटासाठी त्यांनी दाखल केला. दरम्यान दोन दिवसांत 16 अर्जांचे वितरण झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

जिल्हा नियोजन समितीचा (डीपीसी) निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला. त्यानंतर या निवडणुकीसाठी विशेष उत्साह राजकीय पक्षांमध्ये नसल्याचे प्रथम दर्शन जानवत असतानाच बुधवारपर्यंत 16 उमेदवारी अर्ज वितरणासह दोन जागांसाठी अर्जही सादर झाले.

विशेष म्हणजे गतवेळी डीपीसीची निवडणुक अविरोध झाली होती. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमातही निवडणूक अर्थात मतदानाची तारीख स्पष्ट करतानाच त्यात गरज असल्यास या दिवशी मतदान देण्यात येणार असल्याचा उल्लेख करत जणू एक प्रकारे अंदाज बांधत शक्यताही गृहीत धरली आहे.

त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली आपल्या मतदारांची संख्या लक्षात घेता, त्यानुसारच जागा वाटून घेण्याची शक्यताही वर्तविली जात होती. तर कुठल्या पक्षाकडून कुठल्या उमेदवाराची वर्णी या समितीवर लावयची यासाठी पक्षपातळीवर निर्णय होण्याची शक्यता आहे.

आज राष्ट्रवादीच्या निफाड देवगाव गटाच्या सदस्या अमृती पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज ग्रामीण क्षेत्रासाठी सादर केला आहे. वितरीत झालेल्या अर्जांमध्ये दिपाली वारुळे यांनी ग्रामीण क्षेत्रासाठी सुषमा पगारे यांनी मोठ्या नागरी क्षेत्रासाठी एस.सी राखीव जागेतून, सचिन देशमुख यांनी संक्रमणकालीन शेख अब्बास हुसेन, अकिल पठाण, सुरेखा नरेंद्र दराडे यांनी ग्रामीण क्षेत्रासाठी, सुनिल मोरे यांनी लहन नागरी गटासाठी अर्ज नेले आहे.

LEAVE A REPLY

*