#Twitter : ट्विटरने युजरनेम डिस्प्ले नेमची मर्यादा वाढवली

0

ट्विटरने युजरनेम डिस्प्लेची अक्षरसंख्या वाढवली आहे. त्यामुळे मोठं नाव असतानाही अक्षरसंख्या लिमिट असल्याने शॉर्टमध्ये लिहावं लागणा-यांची चिंता मिटली आहे.

ट्विटरने युजरनेम डिस्प्ले अक्षरसंख्या लिमिट 20 हून थेट 50 वर नेली आहे. मर्यादा वाढवल्याने युजर आता आपल्या नावासोबत इमोजीदेखील अॅड करु शकणार आहेत.

काही युजर्सनी ट्विटरच्या या नव्या फिचरचं कौतूक केलं असून, काहींनी मात्र यापेक्षाही महत्वाचे आणि गंभीर बदल गरजेचे असताना ट्विटर या असल्या छोट्या गोष्टींकडे लक्ष का देत आहे अशी विचारणा केली आहे.

तुमचं डिस्प्ले नाव बदलायचं असल्यास ट्विटर प्रोफाईलवर जाऊन उजव्या हाताला वरच्या बाजूला येणा-या ‘एडिट प्रोफाईल’ ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.

यानंतर करंट डिस्प्ले नेमवर क्लिक करा. महत्वाचं म्हणजे युजर फक्त डिस्प्ले नेममध्येच बदल करु शकतात, ‘@user’ नेमवर नाही.

LEAVE A REPLY

*