Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

वैतरणा : पाच दिवसानंतर मृतदेह सापडला; शवविच्छेदन करणारा डॉक्टर फोन बंद करून पसार

Share

नाशिक | प्रतिनिधी 

पिंटू वाळू शिद (वय २०) हा तरुण मासेमारी करत असताना वैतरणा धरणाच्या पाण्यात बुडाला होता. पाच दिवस शोधकार्य करूनही त्याचा मृतदेह मिळून आला नव्हता.

दरम्यान, आज मृतदेह किनाऱ्यावर मिळून आला. छिन्नविच्चिंन्न  अवस्थेत आढळून आलेला मृतदेहाचा जागेवरच शवविच्छेदन करणे गरजेचे होते. यामुळे येथीलच जवळ असलेल्या धारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लचके यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी फोन केला. मात्र, त्यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला.

यावेळी डॉ लचके म्हणाले की, आपण नाशिकला आहोत. यानंतर जेव्हा तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितले की डॉ. लचके तिथेच आहेत. त्यानंतर काही वेळाने डॉ. लचके यांनी फोन बंद करून ठेवला असलायचे निदर्शनास आले.

चार तास उलटूनही मृतदेह आहे त्याच परिस्थितीत पडून होता. नातलगांनी हंबरडा फोडला होता. मात्र, वैद्यकीय अधिकारी राजरोसपणे कामात कसूर करत फोन बंद करून अज्ञात स्थळी गेल्याची नजरेस पडले.

याबाबत डॉ. लचके यांच्याविरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक झाली असून डॉक्टर आल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही अशी भूमिकाच त्यांनी घेतली होती.

दरम्यान, पोलिस निरीक्षक अडसूळ यांनी नातेवाईकांची समजूत काढत 4 तासानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर मृतावर अंत्यसंस्कार झाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!