Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर आगाराच्या बसचे ठाणगाव घाटात ब्रेक निकामी; 20 विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत

Share
ठाणगाव | वार्ताहर 
राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नर आगारातील बसचे आज दि.4 सकाळी 10 वाजेच्या सुमारास ठाणगाव घाटात ब्रेक निकामी झाले. मात्र चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला असून बसमधील प्रवास करणाऱ्या 70 ते 80 शालेय विद्यार्थ्यांचे प्राण वाचले.
चालकाने प्रसंगावधान राखत बस घाटात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दरडीवर नेली. त्यामुळे एका जीवघेण्या अपघातातून सर्वजण बचावले. बस दहा फूट पुढे गेली असती तर वळणावरून खाली दरीत कोसळून मोठा अनर्थ घडला असता. सिन्नर आगाराची आडवाडी येथून सिन्नरला परतणारी बस क्रमांक एम एच 14 बीटी  483 ठाणगाव घाटात आल्यावर शेवटच्या वळणावर तीचे ब्रेक निकामी झाल्याचे चालक भाऊसाहेब गायधनी यांच्या लक्षात आले.
समोरच्या वळणावर असणारी दरी पाहून त्यांनी बस विरुद्ध दिशेला नेत गिअर कंट्रोल करून घाटाच्या दरडीवर धडकवली. या अपघातात एका शिक्षकासह 3 विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या असून 12 ते 15 विद्यार्थ्यांना मुका मार लागला. बस मधून प्रवास करणारे शिक्षक बाबुराव बिन्नर, विद्यार्थिनी सोनाली सदगीर, पायल गांजवे, साक्षी बिन्नर या अपघातात खरचटल्याने किरकोळ जखमी झाल्या.
तर मोहिनी बिन्नर, पायल गांजवे, आरती पवार, अलका बिन्नर, सुचित्रा कोकाटे, राणी बिन्नर, समाधान मोखरे, सोनाली बिन्नर , शैला बिन्नर, वैभव गांजवे, योगेश बिन्नर, अमोल बिन्नर, शुभम गांजवे यांचेसह 20 विद्यार्थ्यांना मुका मार लागल  अपघाताची माहिती मिळतात सिन्नरचे आगार प्रमुख भूषण सूर्यवंशी, प्रमोद घोलप यांनी आगारातील मदत पथकासह ठाणगाव घाटात धाव घेतली.
तोपर्यंत चालकाने रस्त्याने येणाऱ्या प्रवाशांच्या मदतीने जखमी विद्यार्थी व शिक्षकास उपचारासाठी दवाखान्यात हलवले होते. सिन्नर आगाराच्या वतीने सर्व जखमींना उपचारासाठी तातडीची मदत म्हणून प्रत्येकी दोनशे रुपयांची मदत करण्यात आली. बसमधील 70 ते 80 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या चालक गायधनी यांचे पालकांकडून कौतुक करण्यात आले. उपचारानंतर सर्वच विद्यार्थ्यांना दवाखान्यातून घरी जाऊ देण्यात आले.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!