नाशिक जिल्ह्यात सव्वा लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी?

दहा हजारांपेक्षा कर्जमाफी निकषांची उत्सुकता शिगेला

0
नाशिक । शासनाकडून खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकर्‍यांना कर्जमाफी अगोदर दहा हजार रुपये अनुदान देण्याचे नवीन निकष घोषित झाले. मात्र, शेतकर्‍यांना दहा हजार रुपयांच्या मदतीच्या निकषापेक्षा कर्जमुक्तीचे निकष कोणते असतील, याची उत्सुकता शिगेला लावणारी ठरली आहे.

जिल्ह्यात दहा हजार रुपये आर्थिक मदत मिळवणारे सुमारे सव्वा लाख शेतकरी नव्या निकषानुसार पात्र ठरण्याची शक्यता आहे. याच निकषाचे शेतकरी कर्जमुक्तीच्या निकषाला पात्र ठरणार असल्याने त्यामूळे जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाख शेतकर्‍यांची कर्जातून मुक्तता होण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँकेने शासनाच्या नव्या निकषानुसार दहा हजार रुपये अनुदान देण्यासाठी याद्या बनवण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच ज्या शेतकर्‍यांना ही रकम देण्याचे प्रास्ताविक होईल, त्यासाठी शासनाने सुमारे 100 कोटी रुपये बँकेला द्यावेत, अशा मागणीचा प्रस्ताव सहकार विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे.

दहा हजार रुपये अनुदान देताना शासनाने जे निकष नव्या जीआरमध्ये व्यक्त केले आहे. ते ज्या शेतकर्‍यांना लागू होतील. असेच शेतकरी सरसकट कर्जमाफीच्या लाभाला पात्र ठरतील, असा तर्कट जिल्ह्यात काढला जात आहे. त्यामूळे दहा हजाराची मदत पदरात पडल्यानंतर शेतकर्‍यांना पीककर्जमुक्तीचा दुहेरी लाभ होण्याची चर्चा जोर धरून आहे.

जिल्हा बँकेचे सुमारे तीन लाख शेतकरी पीककर्ज, मध्यम कर्जाचे थकबाकीदार आहे. यात अल्पभुधारक, मध्यम भुधारक आणि मोठ्या शेतकर्‍यांची आकडेवारी आहे. यातून शासनाने दहा हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी जिल्हा बँकेला जीआर पाठवून लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्याचे आदेश दिलेले आहे.

त्यामूळे आज जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बकाल यांच्या उपस्थित विभागीय अधिकार्‍यांची आढावा बैठक घेण्यात आली. यात निकषाच्या अनुषंगाने अपेक्षित असलेली माहिती संकलित करण्याचे काम सुरु करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे कळते.

LEAVE A REPLY

*