नालासोपाऱ्यात झोपाळ्याचा फास बसून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

0

मुंबई (प्रतिनिधी) | चेंबूरमध्ये चार वर्षाच्या मुलीचा कोल्ड्रींग समजून फिनाईल प्यायल्याने मृत्यू झाल्याची ताजी असतानाच नालासोपाऱ्यात झोपाळ्याचा फास बसून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

येथील पेल्हार बटरवाडा या भागात ही घटना घडली. राकेश यादव असं मयत मुलाचे नाव असून तो सहावी इयत्तेत शिकत होता.

अधिक माहिती अशी की, शाळेतून घरी आल्यानंतर आईच्या जुन्या साडीचा झोपाळा करून तो खेळत होता. खेळता खेळता अचानक फास आवळत गेला आणि फास लागून त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. घरात एकटा असल्यामुळे कुणाचेही त्याकडे लक्ष गेले नाही. आई घरी परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

नियमित घडणाऱ्या घटनांमुळे पालकांनी सावधानता बाळगण्याची गरज असून मुलांवरील नजर न हटवता ते काय करतात याकडे लक्ष द्यायला हवे. त्यांना अशा गोष्टींपासून कशाप्रकारे धोका निर्माण होऊ शकतो याबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

*