TWEET : सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी केला निर्मात्या किरण श्रॉफ यांचा अपमान

0

‘बाबूमोशाय बंदूकबाज’ चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवली आहे.

‘अ’ (A) प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील ४८ दृश्यांवर कात्री चालवली आहे.

याच विषयावर बोलण्यासाठी मुंबईत ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ चित्रपटाच्या टीमसह इतर काही दिग्दर्शकांनी पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत अनेकांनी सेन्सॉर बोर्डाविरुद्ध आवाज उठवला. महत्त्वाचं म्हणजे ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ चित्रपटाला ‘अ’ प्रमाणपत्र आणि ४८ कटवरच न थांबत सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी निर्मात्या किरण श्रॉफ यांचा अपमानही केला. दिग्दर्शक कुशन नंदी यांनी यावेळी सांगितले की, ‘एक स्त्री असतानाही तुम्ही अशा चित्रपटाची निर्मिती का केली? असा प्रश्न सेन्सॉर बोर्डाच्या एका सदस्याने निर्मात्या किरण यांना विचारला.

इतक्यावरच न थांबता दुसरा सदस्य म्हणाला की, अरे ही तर पँट-शर्ट घालते, ही स्त्री कशी असू शकते?’ सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांचे हे प्रश्न ऐकून सर्वच थक्क झाले.

LEAVE A REPLY

*