TWEET: साडी नेसल्यास मला ‘हिंदुत्त्ववादी’ ‘भक्त’ म्हणाल का? : रविना टंडन

0

अभिनेत्री रविना टंडन स्वतःची मते परखडपणे मांडल्यामुळे ब-याचदा चर्चेत असते.

रविना टंडन हिने ट्विट केलं असून, संघिष्ट म्हणणा-यांवर तिने निशाणा साधला आहे.

ती म्हणाली, मी जर साडी नेसली तर मला ‘संघी’, ‘भक्त’ आणि ‘हिंदुत्ववादी’ ठरवले जाईल का? असा प्रश्न उपस्थित करत तिने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

रविनानं तिच्या ट्विटर अकाऊंटवर गुलाबी आणि निळ्या रंगामधील साडीतले काही फोटो पोस्ट केले आहेत. मला साडी नेसायला आवडते.. मग मी कोणाचाही विचार का करू?, असंही ती म्हणाली आहे.

मात्र चाहत्यांनी तिला तू साडीत सुंदर दिसतेस असंही सांगितलं आहे. त्यानंतर काही चाहत्यांनी तिला तू राजकारण करत असल्याचंही सुनावलं आहे. त्यावेळी तिनेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

अनेकांना वाटतं मी राजकारणात प्रवेश करण्याचा विचार करते आहे. मात्र मला राजकारणात अजिबात रुची नाही.

LEAVE A REPLY

*