TWEET: ‘मुन्ना मायकेल’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

0

टायगर श्रॉफच्या ‘मुन्ना मायकेल’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आले आहे.

हा चित्रपट बॉलिवूडचा पहिला डान्स अ‍ॅक्शन चित्रपट असल्याचा दावा केला जात आहे.

टायगर श्रॉफसोबतच नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

नवाजुद्दीन यात एका आगळ्या-वेगळ्या अवतारात बघायला मिळणार असल्याचे कळते.

इरॉस इंटरनॅशनल आणि विकी राजानी निर्मित हा चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाद्वारे निधी अग्रवाल हा नवा चेहरा बॉलिवूडमध्ये येणार आहे.

LEAVE A REPLY

*